बैरुत
महिनाभरापूर्वीच स्फोटांनी हादरलेल्या लेबनॉनची राजधानी असणाऱया बैरुतमध्ये पुन्हा एका ठिकाणी भीषण आग लागली आहे. बैरुतच्या बंदरांवर पुन्हा एकदा आगीच्या उंचच उंच ज्वाळा दिसून आला. मात्र मागील वेळेप्रमाणे यावेळेस विस्फोटाचा आवाज आला नाही. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. 4 ऑगस्ट रोजी बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये 190 जणांचा मृत्यू झाला होता तर सहा हजारहून अधिक जण जखमी झाले होते.
गुरुवारी दुपारच्या सुमारास बैरुतच्या बंदराजवळील भागांमध्ये आगीच्या उंच ज्वाळा दिसू लागल्या. ही आग नक्की कशी लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र ‘अल जझिरा’ने दिलेल्या वृत्तानुसार लेबनॉनच्या लष्कराने ही आग बंदराजवळ असणाऱया टय़ुटी फ्री सामानाच्या गोदामाला लागली आहे. या गोदामांमध्ये तेल आणि टायरमुळे आगीने भीषण रुप धारण केल्याचे म्हटले आहे.