ऑनलाईन टीम / चंदीगढ
संयुक्त अरब अमिरातमध्ये दुबई येथे होत असलेल्या आशियाई बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर स्वीटी बूरा हीने कास्य पदक कमावले आहे. हे पदक तीने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केलेल्या कृषी कायद्याचा पून्हा विचार करावा असे आवाहन तीने आपल्या ट्वीटवरुन पंतप्रधान मोदींना केले आहे.
स्वीटी बूरा ही हरियाणाच्या हिसार गावची असून ती स्वतः एका शेतकरी कुटुंबातील आहे. अगदी लहान वयातच तीने बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. स्वीटीने २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. भारताच्या प्रमुख महिला बॉक्सरमध्ये तिचा समावेश होतो. तीचे वडील ही शेतकरी असून ते गेल्या सहा महीन्यापासून सूरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी असून ते ही राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहेत.
भारतीय राष्ट्रीय लोकदलाने स्वीटी बूराचे केले अभिनंदन
भारतीय राष्ट्रीय लोकदलाने आशियाई बॉक्सिंग चँपियनशिपचे पदक विजेती स्वीटी बूराचे अभिनंदन करत तूझा देशाला अभिमान असल्याचे म्हटले आहे. तू शेतकऱ्याची मूलगी असल्याने जी भूमिका घेतली आहेस, त्या बद्दल संपूर्ण शेतकरी बांधवांमार्फत आभार आणि तूझ्या भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी खुप साऱ्या शूभेच्छा.