अग्निशमनच्या जवानांनी दाखविले प्रसंगावधान
प्रतिनिधी /बेळगाव
बॉक्साईट रोड येथे विकासकाम करताना जेसीबीचा गॅसवाहिनीला धक्का लागला. त्यामुळे गॅस गळती होऊन आग भडकली. स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्मयात आणली.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास जेसीबीचा धक्का लागल्याने गळती लागली. ऑक्सिजनशी संपर्क होताच गॅसने पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान तसेच मेगा गॅसच्या कर्मचाऱयांनी गळती झालेल्या ठिकाणचे व्हॉल्व बंद करून गॅस पुरवठा बंद केला. यामुळे लागलेली आग आटोक्मयात आणण्यास मदत झाली.
आग लागल्यामुळे बॉक्साईट रोड येथे बघ्यांची गर्दी झाली होती. कोणतेही विकासकाम राबविताना गॅस अथवा विद्युतवाहिनी आहे का, याचा विचार करूनच विकासकाम करणे आवश्यक बनले आहे.