मोरजी/प्रतिनिधी
भारत ,संयुक्त अरब अमिराती,कुवेत मलेशिया आणि अमेरिका या देशात विस्तार असलेल्या बॉबी ग्रुप च्या ” बॉबी ऑक्सजिन रिसॉर्टचे रविवारी बॉबी ग्रुपचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धावपटू डॉ बॉबी शेमानुर यांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.यावेळी ऑक्सजिन रिसॉर्टचे सीईओ गिरीश नायर, सीओओ राजीव नायर,बॉबी ग्रुपचे सीओओ जीसो बॉबी आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ बॉबी शेमानुर म्हणाले, हिरे, सोनेचांदी हा आमचा प्रमुख व्यवसाय मात्र अलीकडच्या काळात आपण हॉटेल व्यवसायात पदार्पण करून भारताशिवाय अन्य देशात नाव कमावले आहे.व्यवसायातून मिळणाऱया उत्पन्नाचा काही भाग आपण सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी करतो गरीब गरजूंना अन्नधान्य पुरवणे त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे असे उपक्रम या बॉबी ग्रुप ऑफ कंपनी कडून राबवले जातात मदर तेरेसा यांच्या मानवतावादी कार्यातून प्रभावित होवून आपण या देशातील लोकांना प्रेम देण्यासाठी आणि प्रेम घेण्यासाठी असे उपक्रम राबवतो असे त्यांनी सांगितले प्रेमातून जीवन सुंदर करू शकतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे.या प्रेमामुळेच आपले सबंध जागतिक कीर्तीचे फुटबॉल खेळाडू दिएगो मॅराडोना यांच्याशी जुळले ते माझे जिवलग मित्र आहेत आपल्या केरळ येथील दागिन्यांच्या दालनाचे उद्घाटन समारंभाला मारडोना केरळ येथे आले होते बॉबी ग्रुप साठी मारडोना ब्रँड ?म्बेसेडर राहिले होते असेही त्यांनी सांगितले
गोव्यातील मोरजी या निसर्गरम्य टेकडीवर रिसॉर्ट सुरू करण्यामागे गोव्याच्या किनाऱया लगतचे नैसर्गिक सौंदर्य कारणीभूत असल्याचे सांगून ते म्हणाले पेडणे तालुक्मयात मोपा या ठिकाणी होणाऱया आंतरराष्ट्रीय विमातळामुळे देश विदेशातील पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढणार आहे त्यांना निसर्गदत्त अश्या जुन्या ऐतिहासिक वास्तूमध्ये राहून निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने आम्ही जुन्या पद्धतीने रिसॉर्टची उभारणी केली आहे भारतीय संस्कृतीचा आनंदही पर्यटकांना या ठिकाणी घ्यायला मिळणार आहे त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पर्यटन व्यवसाया बरोबरच गोव्यात सामाजिक सेवा आणि दानधर्म करण्याचा आमचा मानस आहे तसेच गोव्याच्या फुटबॉल क्षेत्राच्या विकासला आम्ही हातभार लावू असे त्यांनी सांगितले ” रक्तदान करा जीवन वाचवा ” या संदेशाचा प्रसार करण्यासाठी आपण सारे 812 किमी धावण्याचा उपक्रम राबविण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.युनिक वर्ल्ड रेकॉर्ड व गिनीज बुक मध्ये त्याची नोंद झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले इतर कोणाकडूनही आर्थिक मदत न स्वीकारता बेघर जे÷ नागरिकांना आसरा देण्याचे आयुष्यभर आरोग्य आणि अन्नदानाचे पवित्र कार्य आमच्या बॉबी लाईफ व्हिजन चेरिटी होम्स तर्फे आम्ही करीत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे गोव्यात असा दानधर्म करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बॉबी ऑक्सजिन रिसॉर्टचे सीईओ गिरीश नायर यांनी सांगितले की बॉबी ग्रुप ऑफ कंपनीला 159 वर्षाची दीर्घ परंपरा आहे 1863 साली छोटय़ाश्या स्वरूपात सुरू झालेला हा व्यवसाय आज जगभरात विस्तारली आहे बॉबी ग्रुप ऑफ कंपनी मध्ये बॉबी शेमानुर इंटर नॅशनल ज्व?लर्स ,बॉबी ऑक्सजिन रिसॉर्ट बॉबी बाझार , शेमानुर पेडिट्स अँड इंव्हेस्ट मेंट लिमिटेड ( एन बी एफ सी) शेमानुर निधी लिमिटेड ,बॉबी टूर्स अँड ट्रव्हल आणि फिजिकार्ड डॉट कॉम या कंपन्यांचा समावेश आहे आता कारवा टुरिझम आणि बोफास्ट ही लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार तसेच डेली प्रेश मांस उत्पादनाचा ब्रँड असलेला ” बॉश दि बचर” यांचाही समावेश झाल्याचे सांगितले
बॉबी ऑक्सजिन रिसॉर्ट द्वारे पर्यटकांना परवडणाऱया दरामध्ये हॉलिडेज फॉर ऑल या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजानुरुप हॉस्पिटलिटी सेवा पुरवली जाते रिसॉर्ट मध्ये ग्राहकांना आपल्या परिवारासह प्रीमियम सुविधा ,निसर्ग सौदर्य व इतर सेवांचा आनंद घेता येतो बॉबी ऑक्सजिन रिसॉर्टची भारता मध्ये थेकाडी,मुन्नार,अलापुझा उटी, महाबळेश्वर आणि आता गोवा सह 28 पर्यटन स्थळांवर दर्जेदार रिसॉर्ट कार्यरत आहेत.
मोरजी गोवा येथे नव्यानेच सुरू झालेले बॉबी ऑक्सजिन रिसॉर्ट मोरजी समुद्र किनारी भागातील एका छोटय़ा टेकडीवर स्थित असून किनाऱया पासून केवळ 700 मीटर अंतरावर आहे.56 खोल्यांच्या या सुंदर रिसॉर्ट मध्ये आनंद मय पर्यटनाचा आनंद लुटता येतो कौटुंबिक पर्यटन,मधुचंद्र, विकएनड, स्टे आदी साठी सर्वोत्तम स्थळ असल्याचे त्यांनी सांगितले.