पंतप्रधानांनी रशियाच्या राजदूताला केले पाचारण
रशिया आणि युक्रेन यांच्यातील भीषण युद्ध चौथ्या दिवशीही सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्रs डागण्यात येत आहेत. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये प्रचंड नुकसान घडले असून अनेक लोकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यांमध्ये ग्रीसचे 10 नागरिक देखील मारले गेले आहेत.
युक्रेनच्या मारियुपोल शहरानजीक रशियाच्या बॉम्बवर्षावात ग्रीसचे 10 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रशियाच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या मृत्यूनंतर ग्रीसने रशियाच्या राजदूताला पाचारण पेले आहे.
ग्रीसचे पंतप्रधान क्यारीकोस मित्सोटाकिस यांनी आमचे 10 निर्दोष नागरिक मारियुपोलनजीक झालेल्या रशियाच्या हवाईहल्ल्यांमध्ये मारले गेल्याचे म्हणत आता हा बॉम्बवर्षाव बंद करण्यात यावा असे सांगितले आहे. ग्रीसच्या विदेश मंत्रालयाने देखील नागरिकांवर होत असलेल्या हवाई हल्ल्यांची निंदा करत रशियाला हे हल्ले त्वरित रोखण्याचे आवाहन केले आहे.