ऑनलाईन टीम / सातारा :
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ आज दुपारी 2 च्या सुमारास तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघात एक दुचाकीस्वार ठार झाला असून, पाच जण जखमी आहेत. जखमींना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
किरण गुजर असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील अजंठा चौकातून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या दिशेने सर्व्हिस रोडने निघालेल्या मालट्रकचा ठक्कर सिटी येथे टायर फुटल्याने अनियंत्रित झालेल्या ट्रकची कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघात दुचाकीस्वार मध्येच सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या सहाय्याने मालट्रक हटविण्याचे काम सुरू आहे.