रशियाची घुसखोरी रोखण्याचा हेतू
रशियाच्या हल्ल्यादरम्यान देश सोडू न इच्छिणाऱया लोकांसाठी बॉम्ब शेल्टर्सच घर ठरले आहे. सर्वसामान्य जनजीवन कोलमडून पडले असून लोक रशियाचा बॉम्बवर्षाव आणि हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी या बॉम्बशेल्टर्समध्ये एकत्र आहेत.
परंतु बॉम्ब शेल्टर्समध्ये देखील युक्रेनच्या लोकांसमोर मोठी सस्या आहे. रशियाचे लोक आणि युक्रेनियन एकसारखेच दिसतात आणि त्यांची बोलीभाषा देखील जवण्पास एकसारखीच आहे. याचमुळे युक्रेनमध्ये प्रवेश करणारे रशियाचे सैनिक बॉम्ब शेल्टर किंवा सुरक्षित घरांमध्ये सहजपणे घुसखोरी करू शकतात. या समस्येला तोंड देण्यासाठी युक्रेनच्या लोकांनी अनोखी युक्ती लढविली आहे.
बॉम्ब शेल्टर्समध्ये खडूसह विविध बोर्डांवर अनेक ओळी लिहिण्यात आल्या आहेत. येथे लिहिण्यात आलेल्या ओळी युक्रेनच्या लोकांसाठी सामान्य वाटतील अशा आहेत, परंतु एक रशियन हा युक्रेनच्या लोकांप्रमाणे कधीच या ओळी वाचू शकत नाही. अशा स्थितीत बोर्डांवरील या ओळींच्या मदतीने शेल्टरमध्ये दाखल होणाऱया प्रत्येकाची ओळख पटविली जात आहे. रशियाचे सैनिक या शब्दांचा उच्चार युक्रेनच्या लोकांप्रमाणे करू शकत नाहीत.