यामी गौतमचा दावा
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने चित्रपटसृष्टीत स्वतःचा कुणीच गॉडफादर नसल्याचा आणि स्वतःच्या बळावर कारकीर्द घडविल्याचा दावा एका मुलाखतीत केला आहे. यामीने 4 जून रोजी दिग्दर्शन आदित्य धरसोबत विवाह केला होता. तर 2012 मध्ये तिने विकी डोनर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
पुढील वर्षी बॉलिवूडमध्ये मला एक दशक पूर्ण होणार आहे. आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबतच्या बाला चित्रपटाने माझ्या कारकीर्दीला नवे वळण दिल्याचे ती सांगते.
माझ्या जीवनात माझे कुटुंब नेहमीच पाठिशी उभे राहिले आहे. चित्रपटसृष्टीला कधीच पूर्णपणे समजून घेता येत नाही. लोक नेहमीच कारकीर्दीसाठी सल्ले देत राहतात. पण कुठल्या गोष्टी स्वीकारायच्या याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा असतो असे तिने म्हटले आहे.
भूत पुलिस या गुरुवारी प्रदर्शित चित्रपटात यामी ही सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत दिसून आली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याचबरोबर ती अभिषेक बच्चन आणि निमरत कौर यांच्या ‘दसवी’ चित्रपटामध्येही दिसणार आहे.