अक्षय कुमारसोबत झळकणार
पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सरगुन मेहता लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. तिचे बॉलिवूड पदार्पण सुपरस्टार अक्षय कुमारच्या चित्रपटातून होणार आहे. सरगुनने यापूर्वी अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच म्युझिक अल्बम आणि टीव्ही शोंमधून ती झळकली आहे.
अक्षय कुमारच्या ‘मिशन सिंड्रेला’ चित्रपटासाठी सरगुन मेहताला विचारणा करण्यात आल्याचे समजते. अक्षयसोबत काम करण्यास मिळणार असल्याने सरगुन आनंदी आहे. बॉलिवूड पदार्पणासाठी योग्य संधीची वाट पाहत होते, योग्य भूमिका मिळणे अत्यंत महत्त्वाचे होते असे सरगुनने म्हटले आहे.
मिशन सिंड्रेला या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी एम. तिवारी सांभाळत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत रकुल प्रीत सिंह देखील दिसून येणर आहे. हा चित्रपट ओटीटीवर झळकू शकतो. सरगुनने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. याचबरोबर पंजाबी चित्रपटसृष्टीतील ती आघाडीची नायिका आहे.