ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमार, गोविंदानंतर आता पती-पत्नी और वो, टॉयलेट एक प्रेमकथा मधील अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची बाधा झाली आहे.
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, सध्या माझी प्रकृती ठीक असून मी विलगीकरणात आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या नियमांचे पालन करीत आहे. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले त्यांनी स्वतः ची टेस्ट करून घ्यावी असे आवाहन देखील तिने केले आहे.
तर दुसरीकडे उरी फेम विकी कौशलला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. विकी कौशल सध्या होम क्वारंटाइन असल्याची माहिती मिळाली आहे.
विकी कौशल ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन विकी कौशल याने केले आहे.
- अंगुरी भाभीला देखील कोरोना
या सोबतच भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या तिने स्वत:ला होम क्वारंटाइन केले असून सर्व नियमांचे पालन करत असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये शुभांगी अत्रेनेे अंगुरी भाभीची भूमिका साकारली आहे.