प्रतिनिधी /वास्को
बोगदा वास्को येथील श्री गजानन मंदिराचा 35 वा वर्धापनदिन सोहळा व वार्षिक जत्रोत्सव दि. 3 ते 8 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
गुरूवार दि. 3 रोजी सकाळी 9 वा. श्री. पंकज रमाकांत भगत व सौ. रेश्मा पंकज भगत व भगत कुटुंबिय बोगदा वास्को यांच्याहस्ते वार्षिक धार्मिक विधीना सुरूवात होईल. प्रथम देवताप्रार्थना, पुण्याहवाचन, मातृकापूजन, देवनांदी, आचार्यवरण, देवता स्थापना, नवग्रहस्थापना, अथर्वशीर्षजप, ग्रहहोम, तसेच श्री बोगदेश्वर वर्धापनदिनानिमित्त बोगदेश्वराला पंचामृत अभिषेकपूर्वक लघुरूद्र, महापूजा, तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ग्रामस्थांतर्फे भजन.
शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 8 वा. परिवार देवता श्री देवी नवदुर्गा व श्री ब्रह्मेश्वर यांना पंचामृत अभिषेक, महागणपतीप्रित्यर्थ गणपती पुरश्चरणांग होमहवन नवचंडी अनुष्ठान, श्रींची महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, दुपारी 11.30 वा. गणेशजन्मावर ह.भ.प. चंद्रहासबुवा जोशी यांचे सुश्राव्य किर्तन, त्यानंतर दुपारी 12.40 वा. गणेशजन्म पाळणा, महाआरती, महागाऱहाणे, आशीर्वचन, तीर्थप्रसाद व नंतर सर्व भाविकांना प्रसाद, दुपारी 2 वाजल्यापासून ग्रामस्थांतर्फे सुरू होणाऱया भजनाच्या खास कार्यक्रमात शारदा संगीत विद्यालय, ब्राह्मणेश्वर भजनी मंडळ सडा, गजानन बोगदेश्वर महिला भजनी मंडळ, लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, जेटी भजनी मंडळ, समर्थ भजनी मंडळ या भजनी मंडळाची भजनसेवा, रात्री 11.21 वा. पालखी व दीवजोत्सव. पालखी बोगदेश्वर स्थळाला जाऊन आल्यावर दारूकामाची आतषबाजी, महाआरती, प्रसाद वितरण.
शनिवार दि. 5 रोजी सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी 5 वा. वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा, (यजमान ः श्री. दत्ताराम प्रकाश धुरी व सौ. शर्मिला दत्ताराम धुरी), आरती, प्रसाद वितरण व रात्री 8.30 वा. ग्रामस्थातर्फे रात्रभर भजन. यंदा देवस्थानच्या वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेला 144 वर्षे पूर्ण होत आहेत.
रविवार दि. 6 रोजी सकाळी धार्मिक विधी, गणहोम व सायंकाळी 7 वा. भजनाचा कार्यक्रम व नतंर महाआरती व तीर्थप्रसाद. सोमवार दि. 7 रोजी सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी 7 वा. श्री गजानन भोगदेश्वर महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम. मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 9 वा. वास्कोतील प्रतिष्ठित नागरिक श्री बैरान्ना गौडा यांच्याहस्ते धार्मिक विधी, नंतर आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी 4 वा. सार्वजनिक हळदीकुंकू व ग्रामस्थातर्फे भजन व आरती होऊन श्री गणेश शयांती उत्सवाची सांगता होईल. गणेश जयंतीचा मुख्य श्रीफळ गुरूवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. मंदिरात ठेवण्यात येईल. मंगळवार दि. 1 मार्च रोजी श्री गजानन मंदिरात शुद्धीकरण होम आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, कोविड महामारीमुळे सरकारने जारी केलेल्य़ा नियमाचे उल्लंघन होऊ नये तसेच कोणीही कोविड बाधित होऊ नये यासाठी गणेश उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा नाटय़ प्रयोग होणार नाही तसेच जत्रोत्सवानिमित्त फेरी भरणार नसून भाविकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.