वृत्तसंस्था/ ऍडलेड
ऍडलेड आंतरराष्ट्रीय महिलांच्या डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची युपेनची साथीदार नादिया किचेनॉक यांचे महिला दुहेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा व रामकुमार रामनाथन यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
शुक्रवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाची टॉपसीडेड बार्टी आणि सँडर्स यांनी सानिया व नादिया यांचा 6-1, 2-6, 10-8 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. हा सामना 70 मिनिटे चालला होता. या स्पर्धेत पुरुष विभागात भारताच्या रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन यांनी दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. बोपण्णा आणि रामनाथन या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या बॉन्झी आणि नेस यांचा 6-1, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला.