वृत्तसंस्था/ मियामी
भारताचे रोहन बोपण्णा व सानिया मिर्झा यांना मियामी ओपन स्पर्धेतील दुहेरीतून बाहेर पडावे लागले. त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
बोपण्णा व कॅनडाचा डेनिस शॅपोव्हॅलोव्ह यांना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सहाव्या मानांकित हॉलंडचा वेसली कूलहॉफ व ब्रिटनचा नील स्कुपस्की यांच्याकडून 2-6, 1-6 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. बिगरमानांकित बोपण्णा-डेनिस यांनी आधीच्या फेरीत अग्रमानांकित निकोला मेक्टिक व मेट पॅव्हिक यांना पराभवाचा धक्का दिला होता.
बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्ससमवेत खेळणाऱया सानिया मिर्झाला दीड तासाच्या संघर्षपूर्ण लढतीत चीनच्या एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा व झाओझुआन यांग यांच्याकडून 3-6, 6-7 (3-7) असा पराभव स्वीकारावा लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले.