छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ात घातला दुग्धाभिषेक
प्रतिनिधी / सातारा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई हे बुजगावणे आहेत का ? आमच्या दैवताच्या पुतळय़ाचे रक्षण करता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही. लवकरात लवकर त्यांनी योग्य ती ऍक्शन घ्यावी अन्यथा कन्नडींगाना फोकळून काढले जाईल, अशा शब्दात शिवसेनेचे सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांना इशारा दिला. दरम्यान, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ास दुग्धाभिषेक घालण्यात आला.
कर्नाटकात झालेल्या घटनेचे दुसऱ्या दिवशीही साताऱ्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेच्यावतीने साताऱ्यातल्या वाढे फाटा चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांच्या प्रतिमेला जोडे मारुन तिव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दत्ताभाऊ नलावडे, उपतालुकप्रमुख रमेश बोराटे, रवींद्र शेळके, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे, गणेश नलावडे, वाढे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर नलावडे, मनोज नलावडे, अजित नलावडे, संजय जाधव, संजय गायकवाड, निलेश चव्हाण, सतीश कदम, संदीप नलावडे, निखिल नलावडे आदी शिवसैनिक मोठय़ा संख्यने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना दत्ताभाऊ म्हणाले, अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या आमच्या दैवताबाबत चुकीचे प्रकार कर्नाटकात होत असतील तर तेथील सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आम्ही चुकीचे प्रकार खपवून घेणार नाही. संबंधित प्रकाराचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई न केल्यास कन्नडीगांना फोकळून काढु, असा इशारा दिला आहे.
शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास दुग्धाभिषेक
शिवसेनेच्यावतीने शिवतीर्थावर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी जयभवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. शिवसैनिकांच्यामध्ये हे आंदोलन करताना उत्साह संचारला होता.