प्रतिनिधी / नागठाणे
बोरगाव पोलिसांच्या पथकाने काशीळ (ता. सातारा) येथे आज दोघा मोटारसायकल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र विठ्ठल क्षेत्री (वय २४, रा. मत्त्यापूर, ता. सातारा मूळ रा. काळसंगी, ता. इंडी, जि. विजापूर- कर्नाटक) व महावीर उर्फ सचिन सोमाजी पवार (वय ३२, रा. दत्तनगर, कोडोली, ता. सातारा मूळ रा. व्हन्नाळी, ता.कागल जि.कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पुणे- बंगळूर महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीमध्ये असणा-या सेवारस्त्यावर हे दोघे नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलीसह उभे होते. या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने त्यांच्याकडे चोैकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून संशयितांनी नागठाणे येथून एक मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सहायक फौजदार रामचंद्र
फरांदे, सिध्दनाथ शेडगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजाविली. चोरलेल्या एक मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आह. घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.