प्रतिनिधी /फोंडा
बायथाखोल-बोरी येथे अज्ञात चारचाकीने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीचालक जखमी झाला. ओंकार नाईक (28, सावईवेरे) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात शनिवार रात्री 8 वा. सुमारास घडला.
प्रात्प माहितीनुसार ओंकार हा एक्टीवा दुचाकीने जीए 05 एम 7584 फोंडय़ाहून मडगांव दिशेने जात होता. बायथाखोल बोरी येथे पोचला असता मडगावहून फोंडय़ाच्या दिशेने भरघाव वेगाने येणाऱया चारचाकीने त्याच्या दुचाकीला ठोकरले. त्यानंतर चारचाकीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत ओंकार याला फोंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नेंदविण्या आली असून चारचाकीचालकाचा शोध पोलीस घेत आहे.