प्रतिनिधी /फोंडा
बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात 73वा प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचार्य सुब्रमण्यम भट यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राध्यापक यशोधन खराडे, कुणाल बोरकर, श्रीपाद मराठे उपस्थित होते. प्राचार्य भट म्हणाले की, देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली त्यानंतर हा दिवस प्रजासत्तात दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असून युवकांनी जबाबदारी स्वीकारून देशाभिनान बाळगून स्वातंत्र्य जपण्याचे कर्तव्य पार पाडावे. अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव कायम ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राध्यापिका गायत्री बेहरे यांनी आभार मानले. आशय कोरडे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.