बोर्डेतील होमकुंड उत्सव अमाप उत्साहात. : धोंडगणांसह देवीच्या कळसाने केले अग्निदिव्य पार.
डिचोली/प्रतिनिधी
बोर्डे डिचोली येथील देव श्री वडेश्वराच्या प्रांगणात शिमगोत्सवानिमित्त मोठय़ा उत्साहात होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे या उत्सवातील व्रतस्थ धोंडगण व देवीच्या कळसाने अग्निदिव्य पार केले. हे दृश्य पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने लोकांनी बोर्डे गावतील वडेश्वराच्या प्रांगणात उपस्थिती लावली होती.
डिचोली तालुक्मयात तसेच इतरही भागात शिमगोत्सवात होमकुंड उत्सवाची पर्वणी लोकांना मिळतच असते. बोर्डे डिचोली येथील होमकुंड उत्सवाची हि परंपरा टिकवून ठेवताना आजही मोठय़ा संख्येने युवा धोंडगण म्हणून या उत्सवात सहभागी होतात. या धोंडगणांच्या सोवळय़ा व्रताला होळीच्या दिवसापासून प्रारंभ झाला होता. तर मंगळ. दि. 30 मार्च रोजी होमकुंड उत्सवाच्या दिवशी या धोंडगणांनी केवळ फराळ ग्रहण केला.
श्री देव वडेश्वराच्या प्रांगणात रचून ठेवण्यात आले होते. संध्याकाळी देवीचा कळस वाजत गाजत वडेश्वरचरणी आणून भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला. रात्री 12 वा. च्या सुमारास देवीचा कळस व धोंडगणांनी होमकुंडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर होमकुंडाला अग्नि दिला व देवीचा कळस व धोंडगण गावतडी (व्हाळशी) येथील पवित्र झरीवर स्नानासाठी गेले.
या झरीवर स्नान केल्यानंतर तसेच देवीच्या कळसाला नेसविण्यात आल्यानंतर कळस व धोंडगण पुर्ववत श्री वडेश्वर देवस्थानजवळ येण्यास निघाले. येताना वाटेत भेटणाऱया श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्रीवंत देवळी, चव्हाटा येथील ब्राह्मण या देवतांना दर्शन देत तसेच ओटी भरत वडेश्वर देवस्थानजवळ दाखल झाले. यावेळी सर्वप्रथम धोंडगणां?नी मुखातून देवाचे नाव जपत होमकुंडातून मार्गक्रमण के?ले. तर नंतर कळस घेतलेला मोडपुरूषाने होमकुंडातून मार्गक्रमण केले. हा सोहळा डोळय़ात टिपण्यासाठी मोठय़ा संख्येने लोकांनी बोर्डे येथे उपस्थिती लावली होती. त्यानंतर देवीचा सर्वांना कौलप्रसाद दिल्यानंतर या उत्सवाची सांगता झाली.