गौरव तांबे/ चिपळूण
समृध्द कोकणात निसर्गाबरोबरच विविध कलाविष्कारांचीही श्रीमंतीं अनुभवयास येते. याच कलेचा वारसा जपत बोलक्या बाहुल्यातून आनंददायी शिक्षण देणारे कलाशिक्षक तुकाराम पाटील यांनी याची सामाजिक प्रबोधनाशीही सांगड घातली आहे. आपल्या अभिनव कलाविष्कारातून त्यांनी सती विद्यालयात स्वतंत्र कलादालन उभारले असून अनेकांनी याची दखल घेऊन पुरस्कारही दिले आहेत.
मुळ कोल्हापूरचे कलाशिक्षक तुकाराम पाटील 2003 साली सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी-चिंचघरी-सती न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. केवळ चाकोरीबध्द शिक्षण न देता काहीतरी नाविन्यपूर्ण करायचे, अशी उर्मी बाळगून त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. यासाठी विद्यालयात त्यांनी स्वतंत्र कलादालन उभारले आहे. यात शिल्पकलेपासून ते टाकाऊपासून तयार केलेल्या आकर्षक कलाकृतांचा प्रामुख्याने समावेश आहे.
विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून †िशक्षण देण्याच्या विचारातून त्यांना बोलक्या बाहुल्यांची संकल्पना सूचली. या कलेविषयी त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले. आपल्या विशिष्ट शैलीच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘आनंददायी शिक्षण’ देण्यास सुरुवात केली. मनोरंजनातून अध्ययनासाठी बोलक्या बाहुल्या हे माध्यम प्रभावी ठरु लागले आहे. विज्ञान प्रदर्शनातून त्यांनी या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. इतक्यावरच न थांबता याच बोलक्या बाहुल्यांचा वापर करुन जनजागृतीचाही प्रयत्न केला आहे.
या माध्यमातून लेक वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, स्वच्छता अभियान आणि सध्या हाहाकार माजवलेल्या कोरोनाविषयी जनजागृती केली आहे. त्यांचे बोलक्या बाहुल्यांचे कलाविष्कार व्हॉटसऍप, फेसबुकच्या माध्यमातून सर्वत्र पसरले आहेत. †िवद्यालयात राबवण्यात येणाऱया उपक्रमात बोलक्या बाहुल्यांचा खेळ अध्ययनाबरोबर मनोरंजनात्मक ठरु लागला आहे. सध्या त्यांच्याकडे काठी बाहुला, कळसूत्री बाहुली, हातमोजा बाहुली, फिंगर पपेट, छाया बाहुली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने चित्रकलेबरोबरच शास्त्राrय नृत्यकला, वादन कला, रांगोळी कला, वाळू शिल्प, बाहुली नाटय़ आदींचे प्र†िशक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी ते वाडय़ावस्त्यावर जाऊन कलेविषयी धडे देत आहेत.
विविध शाळांत कार्यशाळा घेणार: पाटील
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी कला हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे भविष्यामध्ये विद्यालय व परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कलाविषयक विविध कार्यशाळा घेण्याचा तुकाराम पाटील यांचा मानस आहे.