16 हजारपर्यंत महागणार : बदलासोबत मॉडेल सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिंद्राने भारतीय बाजारात डब्बल फ्रन्ट एअर बॅगसोबत आपली प्रसिद्ध गाडी बोलेरोचे सादरीकरण केले आहे. यामध्ये फ्रन्ट पॅसेंजर-साइड एअरबॅगला कस्टमाइज करण्यासाठी इंटीरियरमध्ये काही प्रमाणात बदल केले आहेत. तसेच डॅशबोर्डवर ग्रॅब हॅण्डलही एक रेग्युलर पॅनल आणि सेंटर कंसोलचा एक नवीन वुडन गार्निश फिनिश दिला आहे. बोलेरोच्या सध्याच्या मॉडेलची किमत हि 8.85 लाख रुपये आणि टॉप-स्पेक ट्रिमची किमत 9.86 लाख रुपये असून दोन्ही मॉडेलच्या किमती या एक्स शोरुम आहेत.
फ्रन्ट पॅसेंजर एअरबॅगला जोडण्या व्यतिरिक्त एसयूव्हीमध्ये दुसरा कोणताही बदल केला गेला नाही. अपडेटेड मॉडेलचा समावेश करण्यासाठी बोलेरोच्या किमतीमध्ये 16,000 रुपयापर्यंत वाढ झाली होती.
पाहुया बोलेरोच्या अन्य सुविधा..
?
बोलेरोमध्ये रिव्हर्स पार्केग सेंसरसह कि लेस एन्ट्री मिळणार
?
एक ऑडिओ सिस्टम, मॅन्युअल एसी, कि लेस एन्ट्री राहणार
?
ब्लूटय़ूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी मिळणार