प्रतिनिधी/ बेळगाव
शिरसीहून निपाणीकडे जाणाऱया भरधाव बोलेरो पिकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटून त्याची धडक झाडाला बसल्याने बोलेरोत बसलेला एक जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील उक्कडजवळ मंगळवारी पहाटे घडली आहे. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघातात मुस्नीफ मेहबूबसाब राणेबेन्नूर (वय 25 रा. शिरसी) हा जागीच ठार झाला. चालक महमद अश्पाक हा किरकोळ जखमी झाला आहे. बोलेरो महिंद्रा क्र. केए बी 4583 वाहन महम्मदअश्पाक हा चालवत होता. मुस्नीफ हा बसला होता. उक्कडजवळ जाताच अचानक अश्पाक याने ब्रेक दाबला. त्यामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि त्याची धडक झाडाला बसली. यावेळी डावीकडे बसलेला मुस्नीफ हा जागीच ठार झाला. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली आहे.