महामार्गावर बिबवणे येथील घटना : सोळा शेळय़ा जागीच ठार, सहा जायबंदी
मेंढपाळाचे दोन लाखाचे नुकसान : महामार्गावरुन शेळय़ा पलिकडे नेत असतानाची घटना
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बिबवणे येथे कुडाळच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱया बोलेरो पिकअपने शेळय़ांच्या कळपाला चिरडले. या जोराच्या धडकेने त्यातील सोळा शेळय़ा जागीच ठार झाल्या, तर सहा जायबंदी झाल्या. ही भीषण दुर्घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यात मेंढपाळाचे सुमारे दीड ते दोन लाख रु. चे नुकसान झाले. महामार्गावरून पलिकडे शेळय़ा नेत असताना ही घटना घडली.
मालवण तालुक्मयातील एक मेंढपाळ आपल्या शेळय़ा शेतात बसविण्यासाठी बिबवणे, पिंगुळी परिसरात आणतो. साधारणपणे अडीचशे ते तीनशे शेळय़ा घेऊन त्याने त्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. आपल्या शेळय़ांचा हा कळप तो मेंढपाळ व त्याचे अन्य कुटुंब महामार्गाच्या पलिकडे नेत होता. त्याचवेळी गोव्याहून कुडाळच्या दिशेने बोलेरो पिकअप वेगात येत होती. शेळय़ांना घेऊन महामार्ग ओलांडत असताना त्या मेंढपाळाने हाताने पिकअप थांबविण्याचा इशारा केला. पण पिकअप सुसाट असल्याने तो चालक बोलेरोवर नियंत्रण आणू शकला नाही आणि त्या कळपाला जोरात उडविले. यात सोळा शेळय़ा जागीच ठार झाल्या, तर सहा शेळय़ा गंभीर जखमी झाल्या.
कळपातील अन्य काही शेळय़ांना दुखापत झाल्याची शक्मयता आहे. त्या मेंढपाळाचे दीड ते दोन लाख रु. चे नुकसान झाले. हा अपघात घडताच तेथील कलिंगड व्यावसायिक व ग्रामस्थ तसेच तेथून जाणाऱया वाहनधारकांनी तेथे धाव घेतली.
तडजोडीने विषय मिटविला
बोलेरो गोवा येथील होती. मेंढपाळाच्या झालेल्या नुकसानापैकी काही मदत करण्याची त्या चालकाची प्रथमदर्शनी मानसिकता दिसत नव्हती. तो चालक काहीसा उद्धटपणे बोलू लागल्याने उपस्थितांचाही पारा चढला. अखेर मेंढपाळ व त्या चालकामध्ये काहींनी समझोता घडवून आणला आणि तडजोडीने विषय मिटविण्यात आला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरपर्यंत नव्हती.
लोकांनी दिला मेंढपाळाला धीर
या पिकअपची धडक एवढी जबरदस्त होती की, महामार्गावर सहा ते सात शेळय़ा चिरडल्या, तर काही रस्त्याच्या बाहेर फेकल्या गेल्या आणि मृत झाल्या. तेथे जमलेल्या लोकांनी त्या मेंढपाळाला धीर दिला. तो मेंढपाळ व त्याच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य शेळय़ांची राखण करीत होते. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही.
घटनेबद्दल हळहळ
घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मालवण तालुक्मयातील एक मेंढपाळ गेली काही वर्षे आपल्या शेळय़ा बिबवणे, पिंगुळी परिसरात आणतो. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तेथे येऊन रोजीरोटीसाठी शेतकऱयांच्या शेतात शेळय़ा बसवितो. मे महिन्याच्या अखेरीस तो शेळय़ांना घेऊन पुन्हा आपले गाव गाठतो. आज त्याच्यावर संकट ओढवले.