नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पारंपरिक बौद्ध साहित्य आणि शास्त्रांसाठी एक पुस्तकालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे. हे पुस्तकालय संशोधन आणि संवादाचे एक व्यासपीठ असेल. या पुस्तकालयाची भारतात निर्मिती करण्यास आनंद होईल आणि आम्ही आवश्यक साधनसंपत्ती प्रदान करू असे मोदी म्हणाले.
पुस्तकालयात विविध देशांमधील बौद्ध साहित्यांच्या डिजिटल प्रती एकत्रित करून त्यांचे भाषांतर केल्यावर ते सर्व बौद्ध भिक्षू तसेच विद्वानांसाठी सहजपणे उपलब्ध करता येणार आहे. समकालीन आव्हानांच्या विरोधात बुद्ध यांचे संदेश कशाप्रकारे आधुनिक जगाला मार्ग दाखवू शकतात हे देखील याच्या संशोधनाच्या कक्षेत सामील असेल, असे पंतप्रधान म्हणाले. समकालीन आव्हानांच्या स्वरुपात पंतप्रधानांनी गरिबी, जातीयवाद, कट्टरवाद, लैंगिक भेदभाव, हवामान बदलासह अनेक विषयांचा उल्लेख केला आहे.
बुद्ध यांचा संदेश प्रकाश भारतातूनच जगभरात फैलावला आहे. हा प्रकाश प्रत्येक नव्या ठिकाणी पोहोचला आहे. बुद्ध यांची विचारसरणी काळासोब फोफावत केली आहे. याचमुळे विविध देश आणि विविध भाषांमध्ये बौद्ध साहित्य मिळत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.