मुंबई
देशाचा अर्थसंकल्प सोमवारी 1 फेब्रुवारीला मांडण्यात आला होता, ज्यात पादत्राणे महाग होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार कच्च्या आणि तयार चामडय़ावर 10 टक्के आयात कर वाढवला जाणार आहे. परिणामी येणाऱया काळात ब्रँडेड चप्पल, बुट तसेच बॅग यांच्या किंमतीत 5 टक्के इतकी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारचा हा निर्णय स्थानिक निर्मात्यांना झटका देणारा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे स्थानिक निर्माते कमकुवत होऊ शकतात. ब्लू क्रोम लेदर, क्रस्ट लेदर आणि सर्व प्रकारच्या तयार लेदरवर 10 टक्के कर लावला जाणार आहे. येणाऱया काळात या निर्णयामुळे दर्जात्मक पादत्राणांच्या निर्मितीवर दबाव दिसणार आहे. भारत सध्याला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ब्राझील आणि आफ्रिका या देशांवर लेदरकरीता अवलंबून आहे. भारत दरवर्षी अंदाजे 5 अब्ज डॉलरच्या चमडय़ांच्या वस्तुंची निर्यात करतो.