ऑनलाईन टीम / बीजिंग :
अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेट प्रांतातील ब्रम्हपुत्रा नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे. हे धरण बांधण्यास भारताचा असलेला विरोध झुगारून चीनच्या संसदेने धरण बांधण्यास मंजुरी दिली आहे.
चीन तिबेटमधील मेडोग काउंटीमध्ये हे धरण बांधणार आहे. थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणार्या विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे.
तिबेटमधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशच्या सीमेतून भारतामध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला सियांग या नावाने ओळखतात. अरुणाचलमधून ही नदी आसाममध्ये प्रवेश करते, तेथे या नदीला ब्रह्मपुत्रा म्हटले जाते. तर चीनमध्ये या नदीला यारलुंग जांगबो असे म्हणतात. चीनने या नदीचे पाणी आडवून धरले तर ईशान्य भारताबरोबरच बांगलादेशमध्येहि दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.