राज्यपाल श्रीधर पिल्लई : राजेंद्र केरकर यांनी दिली देवस्थानची माहिती दिल्यानंतर राज्यपाल भारावले
प्रतिनिधी /वाळपई
गोवा ही देवदेवतांची भूमी आहे. गोव्याबाबत वेगेवेगळय़ा प्रकारचा गैरसमज निर्माण झालेला आहे. मात्र गोव्याच्या अंतरंगामध्ये देवदेवतांच्या मंदिरांमुळे पवित्र निर्माण झालेली आहे. सत्तरी तालुक्मयातील ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेव देवस्थान हे गोमंतकातील एकमेव आहे. भविष्यात हे देवस्थान प्रसिद्धीच्या झोतात येऊन गावाच्या विकासाला चांगली संधी आहे. यासाठी येणाऱया काळात या देवस्थानची आख्यायिका अबाधित राखण्याच्या दृष्टिने भाविक करीत असलेले कार्य खरोखरच अतुलनीय असून त्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी केले आहे.
इतिहास संशोधक राजेंद्र केरकर यांनी या देवस्थानची आख्यायिका व पूर्व इतिहास या संदर्भात त्यांना सविस्तर माहिती दिल्यानंतर ते भारावले. अशी देवस्थानेही गावाच्या व राज्याच्या विकासाचे महत्त्वाची केंद्र असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.
गोवा संपूर्ण दर्शन या उपक्रमाअंतर्गत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी बुधवारी ब्रम्हादेव देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित केलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ग्रामस्थांनी देवस्थानच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. यावेळी देवस्थानचे पुजारी संदीप केळकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रिता पिल्लई यांची गावातील महिला भगिनी खणा-नारळाने ओटी भरली. तत्पूर्वी राज्यपालांनी सपत्नीक देवदर्शन घेतले.
देवस्थानबाबत राजेंद्र केरकर यांनी माहिती दिली. या देवस्थानची आख्यायिका ही प्रत्येकासाठी ऊर्जास्रोत आहे. असे देवस्थान केवळ सत्तरी तालुक्मयामध्ये असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राजस्थानमध्ये असे मंदिर आहे. यामुळे हे मंदिर निसर्ग पर्यटन व पर्यटन विकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून या देवस्थानचे सौंदर्यीकरण करून या भागांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टिने दिलेले सहकार्य यामुळे येणाऱया काळात हे देवस्थान म्हणजे विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनणार, असे यावेळी राजेंद्र केरकर यांनी सांगितले.
ग्रामस्थ, भाविकांचे कार्य कौतुकास्पद !
त्याचप्रमाणे या देवस्थानची ऐतिहासिक माहिती त्यांनी राज्यपाल श्री. पिल्लई ब्रह्माकरमळी या गावाचे एकूण वैभव व या गावाच्या निर्मितीसंदर्भात राजेंद्र केरकर यांनी राज्यपालांना सविस्तरपणे माहिती दिली. त्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यपालांनी या देवस्थानच्या विकासासंदर्भात गावातील सर्व ग्रामस्थ व भाविक एकसंध होऊन देवस्थानच्या विकासासाठी करीत असलेले कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. येणाऱया काळात अशा प्रकारची देवस्थाने यांची आख्यायिका अबाधित राहावी, यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी देवस्थानचे सखाराम देसाई यांनी त्यांना ब्रह्मदेव देवस्थानची प्रतिमा भेट दिली. तर देवस्थानचे पुजारी संदीप केळकर यांनी त्यांना ब्रह्मदेव यांच्यावर लेखन केलेले पुस्तक प्रदान केले. यावेळी राज्यपाल पिल्लई यांनी ब्रह्मदेवाच्या आरतीमध्ये सपत्नीक सहभाग दर्शविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गाडगीळ यांनी केले. यावेळी सरपंच प्रशांत मराठे, स्थानिक पंच पराग खाडीलकर, देवस्थान पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्यने उपस्थिती होते.