खगोलशास्त्रज्ञांनी महाविशाल कृष्णविवरांचा (सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल्स) आतापर्यंतचा सर्वात विस्तृन नकाशा तयार केल आहे. ब्रह्मांडातील जितक्या कृष्णविवरांचा शोध लागला आहे, त्या सर्वांना यात सामील करण्यात आले आहे. नकाशा पाहून दुर्लभ मानल्या जाणाऱया अतिविशाल कृष्णविवरांची संख्या प्रत्यक्षात खूपच अधिक असल्याचे समजते. अतिविशाल कृष्णविवरांचा दव्यमान (मास) सूर्याच्या द्रव्यमानापेक्षा 10 अब्ज पटीने अधिक असतो. सामान्य कृष्णविवरांचा द्रव्यमान सूर्यापेक्षा 7 अब्ज पटीने अधिक असतो.
केवळ 4 टक्के आकाशाचे हे दृश्य
मृतप्राय ताऱयांमधील स्फोट किंवा न्यूट्रॉन ताऱयांमधील टक्करमुळे हे कृष्णविवर तयार होतात आणि त्यांच्यामुळे अंतराळ-वेळ बदलतो. यांचे गुरुत्वाकर्षण बळ अधिक असल्याने प्रकाशही त्यामधून बाहेर पडू शकत नाही. नकाशात काळय़ा पार्श्वभूमीवर पांढऱया रंगाच्या मदतीने एक एसबीएच दाखविण्यात आला आहे. हा नकाशा ऍस्ट्रानॉमी अँड ऐस्ट्रोफिजिक्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात 25000 एसबीएच दिसत असून प्रत्यक्षात ब्रह्मांडाता याहून कितीतरी अधिक प्रमाणात एसबीएच आहेत. हा नकाशा तयार करण्यासाठीचा डाटा उत्तर गोलार्धाच्या आकाशाच्या केवळ 4 टक्के हिस्स्यातून घेण्यात आला आहे.
अतिविशाल कृष्णविवरांची निर्मिती
एका थिअरीनुसार बिग-बँगसोबतच हे अतिविशाल कृष्णविवरांची निर्मिती झाली होती, ज्या प्रक्रियेला डायरेक्ट कोलॅप्स म्हटले गेले आहे. यानुसार किमान आकाराचे विशाल एसएमबीएच निर्माण झाले, ज्यांचे मास आमच्या सूर्यापेक्षा लाखो पटीने अधिक होते. तर दुसऱया थिअरीनुसार एसएमबीएच बिग-बँगच्या बऱयाच कालावधीनंतर विशाल ताऱयाचे अस्तित्व संपून अतिविशाल कृष्णविवरांची निर्मिती झाली आहे.