रणवीर कपूर अन् आलिया भट्टचा चित्रपट
दीर्घ प्रतीक्षेनंतर चालू वर्षातील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र-1’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2 मिनिटे 51 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यात आल्याचे दिसून येते. ट्रेलरमध्ये फॅन्टेसी सीन आणि जबरदस्त व्हीएफएक्स असून ते हॉलिवूडच्या तोडीचे आहे. चाहते या ट्रेलरला मोठा प्रतिसाद देत आहेत. ट्रेलरमध्ये रणवीर कपूर आणि आलिया भट्टची रोमँटिक केमिस्ट्री देखील दिसून येतेय. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ बच्चन, रणवीर कपूर, आलिया भट्ट, अक्किनेनील नागार्जुन आणि मौनी रॉय हे दिग्गज कलाकार आहेत. मौनी यात जुनून नावाच्या नकारात्मक भूमिकेत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका कॅमियो भूमिकेत दिसून येणार असल्याची चर्चा आहे. हा सर्वात मोठा एपिक चित्रपट असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
ब्रह्मास्त्र हा एक फॅन्टेसी चित्रपट असून त्याची घोषणा 2014 मध्ये करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे या चित्रपटाच्या निर्मितीला विलंब झाला होता. अखेर 8 वर्षांनी या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.