उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसेच गृहमंत्र्यांची उपस्थिती
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश्वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना पद्मश्री पुरस्कार 2022 राष्ट्रपती भवन दिल्ली येथे काल सोमवारी प्रदान करण्यात आला.
श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या इतिहासात प्रथमच माननीय राष्ट्रपती, राष्ट्राचे सर्वोच्च अधिकारी यांनी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना आमंत्रित करुन पद्मश्री पुरस्कार 2022 बहाल केला ही गोव्याच्या तसेच संप्रदायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची बाब आहे.
सोहळय़ास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू, सविता रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा तसेच विविध प्रति÷ित महनीय मान्यवरांसह श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालिका ऍड. ब्राह्मीदेवीजी, श्रीराज शेलार, महाप्रबंधक शुभक्षण नाईक, कृपाकांक्षी शशिकांत केरकर, उद्योजक रमेश फडते, विश्वजित गावस उपस्थित होते.