प्रतिनिधी /पणजी
पद्मश्री पुरस्कारप्राप्त सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी व माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांचा राजभवन येथे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते. या सत्काराबद्दल दोघांनी आपल्या भाषणातून राज्यपालांचे आभार मानले.
राजभवन हे लोकभवन झाले असून राज्यपाल आता लोकांचे राज्यापाल बनल्याची प्रतिक्रिया आर्लेकर यांनी प्रकट केली. तसेच राज्यापलांच्या कृतीचे कौतुक केले. पिल्लई यांनी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी व माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांचे समाजातील सेवेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.