वृत्तसंस्था/ चेन्नाई
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया चेन्नयीन एफसी फुटबॉल क्लब संघातील मध्यफळीत खेळणारा ब्राझीलचा फुटबॉलपटू राफेल क्रिव्हेलारो याने आपल्या संघाबरोबर आणखी काही कालावधीसाठी राहण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नयीन एफसी संघाने क्रिव्हेलारो बरोबरच्या करारात वाढ केली आहे.
क्रिव्हेलो आता 2020-21 च्या फुटबॉल हंगामाअखेर चेन्नयीन एफसी संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. 31 वर्षीय क्रिव्हेलारो याने इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या 2019-20 च्या अंतिम सामन्यात दर्जेदार कामगिरी केली आहे. त्याने भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर वैयक्तिक 7 गोल नोंदविले आहेत.