ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यानंतर कोरोनाने थैमान घातले आहे. मागील 24 तासात ब्राझीलमध्ये 31 हजार 890 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1492 रुग्णांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 6 लाख 15 हजार 870 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 34 हजार 039 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
6.15 लाख कोरोनाबाधितांपैकी 2 लाख 74 हजार 997 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3 लाख 06 हजार 834 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना संक्रमणाच्या आकडेवारीत ब्राझीलच्या जगात दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 19 लाख 24 हजार 189 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 10 हजार 179 जणांचा मृत्यू झाला आहे.