ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमधील कोरोनाबळींची संख्या 90 हजारांवर पोहचली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 26 लाख 13 हजार 789 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 91 हजार 397 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी ब्राझीलमध्ये 58 हजार 271 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1189 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 26.13 लाख कोरोनाबाधितांपैकी 18 लाख 24 हजार 095 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 लाख 98 हजार 317 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 46 लाख 34 हजार 985 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 55 हजार 285 जणांचा मृत्यू झाला आहे.