ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.50 लाखांच्या पुढे गेली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 50 लाख 94 हजार 979 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 50 हजार 506 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी ब्राझीलमध्ये 3139 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 270 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 50.94 लाख कोरोनाबाधितांपैकी 44 लाख 70 हजार 165 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 74 हजार 308 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 79 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.