ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये 65 लाख 34 हजार 951 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 75 हजार 981 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
शुक्रवारी ब्राझीलमध्ये 47 हजार 435 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 674 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 65.34 लाख बाधितांपैकी 57 लाख 44 हजार 369 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 लाख 14 हजार 601 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या देशात आतापर्यंत 2 कोटी 57 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.