ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांसमीप आहे. या देशात आतापर्यंत 74 लाख 84 हजार 285 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 91 हजार 146 जणांचा मृत्यू झाला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, रविवारी ब्राझीलमध्ये 18 हजार 479 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 331 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 74.84 लाख कोरोनाबाधितांपैकी 65 लाख 15 हजार 370 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 7 लाख 77 हजार 769 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 95 लाख 73 हजार 847 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3 लाख 41 हजार 138 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा तर ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो.