ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये 59 लाख 83 हजार 089 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 68 हजार 141 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी ब्राझीलमध्ये 35 हजार 686 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 644 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 59.83 लाख कोरोनाबाधितांपैकी 54 लाख 07 हजार 498 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 07 हजार 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 19 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 20 लाख 72 हजार 560 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 58 हजार 354 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा तर ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो.