ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये 62 लाख 04 हजार 570 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 55 लाख 28 हजार 599 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
ब्राझीलमध्ये गुरुवारी 37 हजार 672 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 698 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5 लाख 04 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 71 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 19 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.