ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये 77 लाख 54 हजार 560 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 68 लाख 75 हजार 230 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.
वर्ल्डोमीटरनुसार, या देशात सोमवारी 20 हजार 814 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 573 जणांचा मृत्यू झाला. सध्या 6 लाख 82 हजार 739 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 96 हजार 591 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.