ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील 24 तासात ब्राझीलमध्ये 18 हजार 925 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 813 रुग्णांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 7 लाख 10 हजार 887 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 37 हजार 312 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
7.10 लाख कोरोनाबाधितांपैकी 3 लाख 25 हजार 602 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3 लाख 47 हजार 973 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 20 लाख 26 हजार 597 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 13 हजार 061 जणांचा मृत्यू झाला आहे.