दिव्या राणे : कोपार्डे अगरशाळा प्रकल्पाचा शिलान्यास : सहा महिन्यांत बांधकाम होणार पूर्ण
प्रतिनिधी /वाळपई
गोवा ही देवदेवतांची भूमी आहे. या देवभूमीने गोव्याला एक आदर्श स्थान निर्माण करून दिले आहे. आपली देवस्थाने ही विकासाची केंदे बनले पाहिजेत. सत्तरी तालुक्मयातील कोपार्डे ब्राह्मणी महामाया देवस्थान हे जागृत म्हणून ओळखले जात आहे. त्वचा रोगावर उपयुक्त तीर्थस्थान म्हणून या देवीची एक वेळी वेगळी अशी ओळख निर्माण झालेली आहे. यामुळे येणाऱया काळात याच तीर्थस्थान माध्यमातून या देवीची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करूया, असे आवाहन पर्ये मतदार संघ नवनिर्वाचित सदस्य डॉ. दिव्या राणे यांनी केले आहे. ब्राह्मणी महामाया देवस्थानाच्या अगरशाळा बांधकामाच्या शिलान्यास समारंभात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या
याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्यां विजयादेवी राणे, देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश सावंत, बांधकाम समिती अध्यक्ष सहदेव सावंत, स्थानिक पंच सदस्य विठो वरक, देवस्थान समिती सभासद दयानंद सावंत, चंद्रू सावंत, दीनानाथ सावंत, काशिनाथ सावंत, कृष्णा सावंत, येसो सावंत यांची उपस्थिती होती.
सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार
या देवस्थानाची आख्यायिका जागतिक स्तरावर निर्माण व्हावी यासाठी देवस्थानाच्या भाविकांनी व नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या देवस्थानाच्या माध्यमातून त्वचारोगावर उपयुक्त तीर्थस्थान विकसित झालेले आहे. यामुळे दरवषी शेकडोंच्या संख्येने तीर्थस्थानासाठी येणाऱयांची व्यवस्था व्यवस्थितपणे होत नसल्यामुळे देवस्थानाच्या महाजनांनी नवीन अगरशाळा बांधण्याचे काम हाती घेतलेले आहे. सुमारे एक कोटी तीस लाख खर्चून याचे बांधकाम करण्यात येणार असून याबाबत शिलान्यास आयोजित करून या देवीच्या चरणी कार्य करण्याची एक नवी संधी प्राप्त झालेली आहे. सहा महिन्यांच्या आत हा प्रकल्प निश्चितच पूर्ण होईल. यासाठी पूर्णपणे सहकार्य देण्याचे आश्वासन यावेळी दिव्या राणे दिले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या विजयादेवी प्रतापसिंह राणे यांनी कोपार्डे गावाच्या जनतेने प्रतापसिंह राणे व विश्वजीत राणे यांच्या राजकीय स्तराला एक चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. यामुळे या देवस्थानाची अगरशाळा सहा महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
गावातील मुलांनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन नमन सावंत यांनी केले तर सुरेश सावंत यांनी आभार मानले. यावेळी मोठय़ा प्रमाणात गावातील ग्रामस्थ भाविक, महाजन यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी दिव्या राणे व विजयादेवी राणे यांनी श्री ब्राह्मणी महामायेचे आशीर्वाद घेतले. अगरशाळा बांधकामाबाबत माहिती सहदेव सावंत यांनी दिली.