प्रतिनिधी / बेळगाव
ब्राह्मण अभिवृद्धी निगमच्या कर्नाटक शाखेतर्फे ब्राह्मण समाजातील गरीब कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे किट वितरित करण्यात आले. यावेळी बेळगाव विभागाच्या संचालिका प्रिया पुराणिक यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. कुलकर्णी, शिरीष कानेटकर, हुनगुंद, अशोक पुराणिक आदी उपस्थित होते.
एस. एम. कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाचे संघटन किती आवश्यक आहे यावर विचार व्यक्त केले. हुनगुंद यांनी गायत्री भवनबद्दल माहिती दिली. सदर किट निगमचे संचालक सच्चिदानंद मूर्ती, वसंत नाडोजी यांच्या सहकार्याने व शिवराम हेब्बार यांच्या पुढाकाराने देण्यात आले. याप्रसंगी 210 कुटुंबांना किट देण्यात आले. शिरीष कानेटकर यांनी आभार मानले.