वृत्तसंस्था/ ब्रिग्टन
ब्रिटनमध्ये सुऊ असलेल्या एफ ए चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्य सामन्यात ब्रिग्टनने विद्यमान विजेत्या लिव्हरपूलचा 2-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे लिव्हरपूलचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. रविवारी उभय संघातील पाचव्या फेरीचा सामना खेळविला गेला होता.
या सामन्यात मो सलाहने ब्रिग्टनचे खाते उघडले. ब्रिग्टनला जवळपास 30 मिनिटे ही आघाडी राखता आली. 29 व्या मिनिटाला लेव्हिस डंकने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. दरम्यान 92 व्या मिनिटाला मिटोमाने नोंदविलेल्या दुसऱ्या आणि निर्णायक गोलाच्या जोरावर ब्रिग्टनने लिव्हरपूलचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले.