वृत्तसंस्था/ ऑकलंड
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील ऑकलंड खुल्या पुरूषांच्या क्लासिक टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या कायली एडमंडने पुढील फेरीत प्रवेश मिळविला. पावसाच्या अडथळय़ामुळे या स्पर्धेतील बरेच सामने लांबणीवर टाकण्यात आले.
स्पर्धेच्या दुसऱया दिवशी पावसाच्या अडथळय़ानंतर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एडमंडने फोकिनाचा 6-2, 4-6, 6-3 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात कॅनडाच्या पोस्पिसीलने पोर्तुगालच्या सोसाचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेतील दुसऱया दिवशी केवळ दोन सामने पार पडले.