ऑनलाईन टीम / लंडन :
संपूर्ण जगात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतःच आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्विटर अकाउंट द्वारे दिली होती. त्यानंतर ते एकांतवासात होते. मात्र, त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसानंतर ही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये आतापर्यंत 47 हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून चार हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.