ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटन चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रविवारी रात्री डिस्चार्ज देण्यात आला. असे डाऊनिंग स्ट्रीट च्या प्रवक्त्याने सांगितले. काही दिवसांपासून बॉरीस जॉन्सन हे कोरोनाशी लढा देत होते.
दरम्यान, 27 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर ते एकांतवासात होते.
मात्र, अनेक दिवस होऊनही त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना 6 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना जॉन्सन प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना जनरल वॉर्ड मध्ये हलवण्यात आले.
आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना बोरिस यांनी सर्वांचे आभार मानले. फक्त आभार मानणे पुरेसे नाही मी त्यांचा ऋणी आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.