ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पाचव्यांदा पिता बनले आहेत. जॉन्सन यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी लंडनमध्ये आज मुलाला जन्म दिला. कोरोनाच्या उपचारानंतर ब्रिटीश पंतप्रधान नुकतेच बरे झाले झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय कॅरी सायमंड्स यांनी बुधवारी लंडनच्या रुग्णालयात सुदृढ बाळाला जन्म दिला, अशी घोषणा बोरिस जॉन्सन यांच्या प्रवक्त्याने केली.
ते म्हणाले, लंडनच्या हॉस्पिटलमध्ये आज सकाळी निरोगी बाळाला जन्म दिल्याची घोषणा करताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि मिस कॅरी सायमंड्स अत्यंत आनंदी आहेत. आई आणि मुलगा या दोघांचीही तब्येत चांगली आहे. कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर जॉन्सन यांच्यावर उपचार करण्यात आले होते. नंतर त्यांची प्रकृती बरी झाली. सोमवारीच ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
2019 च्या सुरुवातीपासूनच जॉन्सन यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या कॅरी सायमंड्स यांच्यासोबत डेटिंग करण्यास जाहीररित्या सुरुवात केली. फ्रेब्रुवारी महिन्यातच त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली होती.
दरम्यान, बोरिस जॉन्सन यांचे पहिले लग्न मरिना व्हीलर यांच्याशी झाले असून त्यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत. मात्र व्हीलर आणि बोरिस जॉन्सन 2018 मध्ये विभक्त झाले.