वृत्तसंस्था/ लंडन
बिली जीन किंग चषक सांघिक टेनिस स्पर्धेत होणाऱया मेक्सिकोविरूद्धच्या प्ले ऑफ लढतीसाठी ब्रिटनच्या संघामध्ये टॉप सीडेड जोहाना कोंटाचा समावेश राहणार नाही. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला इंग्लंड संघातून पहिल्यांदाच वगळण्यात आले आहे.
महिला टेनिसपटूंच्या मानांकनात 18 व्या स्थानावर असलेल्या कोंटाला उदराला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून निवृत्त व्हावे लागले होते. ब्रिटन आणि मेक्सिको यांच्यातील प्ले ऑफ लढतीचा सामना 16-17 एप्रिलला रोहॅम्प्टनच्या टेनिस केंद्रामध्ये प्रेक्षकविना खेळविला जाणार आहे. ब्रिटनच्या संघामध्ये आता कोंटाच्या स्थानी जॉडी बुरेजचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय हीदर वॅटसन, केटी स्वान, हॅरियट डार्ट, केटी बोल्टर यांचाही यात समावेश आहे.