रॉटरडॅम : एटीपी 500 पुरूषांच्या टेनिस स्पर्धेला येथे बुधवारपासून प्रारंभ झाला. ब्रिटनचा माजी टॉप सीडेड तसेच तीन ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया अँडी मरेने पुरूष एकेरीत विजयी सलामी देत पुन्हा एटीपीच्या एकेरीच्या मानांकनात पहिल्या शंभर खेळाडूंत पुनरागमन केले आहे. पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अँडी मरेने कझाकस्तानच्या 31 व्या मानांकित बुबलिकचा 7-6, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. दुखापतीमुळे ब्रिटनच्या मरेला 2018 पासून एटीपीच्या मानांकनात पहिल्या शंभर खेळाडूंत स्थान मिळविता आले नव्हते. जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत मरेला दुसऱया फेरीत पराभव पत्करावा लागला होता. येथील स्पर्धेत मरेचा दुसऱया फेरीतील सामना कॅनडाच्या तृतीय मानांकित ऍलियासिमेबरोबर होणार आहे. ऍलियासिमेने पहिल्या फेरीतील सामन्यात बेलारूसच्या गेरासीमोव्हावर 3-6, 6-2, 6-2 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे. मरे आणि ऍलियासिमे यांच्यातील दुसऱया फेरीच्या सामन्यातील विजयी खेळाडूची गाठ तिसऱया फेरीत कॅमेरून नुरीशी होणार आहे.
Previous Articleसपचे कब्रिस्तान तर आमचे एक्स्पेस वे
Next Article उत्तराखंडमध्ये कुमाव ठरणार निर्णायक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.