ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात रुग्ण सापडल्याने सरकार सतर्क झाले आहे. ब्रिटनहून भारतात येणाऱ्या विमानांवरील 31 डिसेंबरपर्यंतची बंदी आता 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोनाचा नवा प्रकार लक्षात घेऊन ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा 23 ते 31 डिसेंबर दरम्यान स्थगित केली होती. मात्र, भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्याने ब्रिटनच्या विमानांवरील बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतासह 50 देशांनी गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील विमानांना देशात नो एन्ट्री केली आहे.